दिनांक - ३१ / १० / २०१६
शहरांच्या
शाश्वततेची – त्यांच्या विकासाच्या शाश्वततेची मोजदाद – सस्टेनेबल सिटीज इंडेक्स
२०१६ (शाश्वत शहरे निर्देशांक २०१६ )
आजची शहरे शाश्वत
विकासाची कास धरणारी व्हायला हवी तरी ती पुढे जाता शाश्वत शहरे बनतील आणि हे ध्येय
साध्य करण्यासाठी आधी आजची शहरे शाश्वत आहेत की नाहीत, असली तरी ती का आहेत, नसली
तर ती कुठल्या कारणांमुळे नाहीत, शाश्वत विकास साध्य करण्यासाठी त्यांनी काय
करायला हवे, शाश्वतते कडे त्यांची दर वर्षी प्रगती कशी आणि कितपत होते आहे अशा आणि
इतर अनेक पूरक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी शहरांच्या शाश्वततेची मोजदाद, त्यांच्या
शाश्वतते कडील प्रगतीची मोजदाद करण्याची पद्धत असावयास हवी आणि ठराविक मुदतीने ती
मोजदाद व्हायला हवी. या दिशेने करण्यात आलेला एक प्रयत्न म्हणजे सस्टेनेबल
सिटीज इंडेक्स २०१६.
शाश्वत विकास,
शाश्वत शहरे ही संकल्पना काही प्रमाणात सापेक्ष आहे, अजून ह्या संकल्पनांची
व्याख्या पूर्ण पणे झालेली नाही त्यामुळे त्यांची मोजदाद करण्याचे एकच एक प्रारूप
असू शकणार नाही. सस्टेनेबल सिटीज इंडेक्स हा पहिला प्रयत्न आहे, एक प्रारूप आहे. २०१५ साली ह्याची
सुरवात झाली आणि त्या वेळेस जगातील प्रसिद्ध अशा ५० शहरांचा समावेश ह्यात करण्यात
आला होता आणि त्यांचा
पर्यावरणावर होणार परिणाम, त्यांची शाश्वत होण्याची शक्यता आणि त्यांची आर्थिक परिस्थिती
– स्थिरता या बाबींचा विचार त्यांच्या शाश्वततेचा अग्रताक्रम ठरवताना करण्यात आला
होता. शहरांच्या शाश्वततेची मोजदाद करण्याचा प्रयत्न (दुसरी आवृती - सस्टेनेबल सिटीज इंडेक्स
२०१६) विस्तृत करून
त्यात १०० शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
शहरांची शाश्वतता
मोजायची कशी? सस्टेनेबल सिटीज इंडेक्स ने शाश्वततेच्या तीन बाजूंच्या / अंगांच्या
– लोक (सामाजिक), आपली पृथ्वी (पर्यावरण) आणि नफा (आर्थिक ) या माध्यमातून ही
मोजमाप करण्याचा प्रयत्न केला आहे.
शहराच्या आजच्या
– तत्कालीन गरजा, शहराच्या भविष्यातील गरजांची कुठल्याही प्रकारे कपात वा नियंत्रण
न करता भागवणे, त्यांच्यात समतोल साधणे ही गोष्ट शाश्वत
शहराच्या केंद्रस्थानी असते हा विचार, ही व्याख्या सस्टेनेबल सिटीज इंडेक्स ने स्वतःच्या
अहवालाच्या पण केंद्रस्थानी घेतली आहे. शहराचे
सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय आरोग्य / शाश्वतता तपासण्या साठी एकूण ३२ उप-निर्देशांकांचा
वापर केला आहे, त्यातील काही पुढील
प्रमाणे आहेत.
अर्थात शहरांची
शाश्वतता मोजण्यासाठी कुठल्या मुख्य निर्देशांकांचा आणि कुठले उप-निर्देशांकांचा
वापर केला जावा ह्या विषयी मतमतांतर असणार आणि ते असायलाही हवे पण महत्वाचे हे आहे की शहरांची शास्वतता
मोजण्याचे प्रयत्न व्हायला हवे, त्याविषयी विचार व्हायला आणि त्यातून शहरांमध्ये
निकोप स्पर्धा निर्माण होऊन शहरी प्रशासनाने आणि त्या शहराच्या नागरिकांनी आणि घटकांनी
त्यांचे शहर शाश्वत करावयास हवे, शाश्वत विकासाची संकल्पना अंगीकारावयास हवी.